
पेण : प्रतिनिधी
नागोठणे विभागातील पाटणसई ढोकवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 29) त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये स्वागत केले. रविशेठ पाटील यांचे खंदे कार्यकर्ते नारायण आबा सुटे, रामचंद्र देवरे, कोंडीराम आखाडे, सुदाम तोडमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षप्रवेशाने नागोठणे विभागात भाजपची ताकद वाढली आहे. रविशेठ पाटील यांच्या पेणमधील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात पाटणसई ढोकवाडी येथील कमलाकर तांबड्या बागारे, नारायण तांबड्या बागारे, रघुनाथ जोमा भाला, चंद्रकांत खेळ्या हंभीर, उमेश खेळ्या हंभीर, नामदेव पटू भला, हरिजोमा भल्ला, काशिराम बारक्या निरगुड्या, किसन महादू हंभीर, काशिनाथ जानू माडे, देऊ तान्या हंभीर, किरण चंद्रकांत हंभीर, महेंद्र हरी भला, संतोष हरी भला यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.