मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे 1 सप्टेंबरला खा. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाच्या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आता आपला पक्ष भाजपत विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. अतिमहत्त्वाकांक्षेमुळे काँग्रेस पक्ष सोडल्यापासून नारायण राणे अद्यापही भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. भाजपकडून नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे, परंतु त्यांना भाजप प्रवेश देण्यात आला नव्हता. आता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याने त्यांच्यासोबत कोण भाजपत जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Check Also
रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …