Breaking News

गव्हाणमधील बचत गटांची ऑनलाइन नोंदणी

महिलांच्या सबलीकरणासाठी रत्नप्रभा घरत यांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवरात्रोत्सवात सर्वत्र देवीचा जागर होत असताना स्त्रीशक्तीच्या सबलीकरणासाठी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत यांनी पुढाकार घेत गव्हाणमधील महिला बचत गटांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली. त्यामुळे या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत पंचायत समितीचे समन्वय अधिकारी किशोर बोरटे यांनी मार्गदर्शन केले.
चूल आणि मूल या परंपरेला छेद देत महिलांनी विविध क्षेत्रांत प्रगती केली आहे. आज अनेक ठिकाणी महिला नेतृत्व करतानासुद्धा दिसून येतात. ग्रामीण भागातील महिलावर्गही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूण झाला पाहिजे यासाठी पनवेल पंचायत समितीच्या गव्हाण गणातील सदस्य रत्नप्रभा घरत सातत्याने आग्रही असतात. याच अनुषंगाने त्यांनी गावातील महिलांचे बचत गट स्थापन केले आहेत. या गटांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी गव्हाण येथील जयवंत देशमुख यांच्या निवासस्थानी पंचायत समितीचे समन्वय अधिकारी  किशोर बोरटे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.  
या बैठकीला माजी नगरसेविका वर्षा नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य स्नेहलता ठाकूर, जयश्री देशमुख, ग्रामपंचायत सदस्य उषा देशमुख, बचत गट महिला मंडळ अध्यक्ष विद्या देशमुख, पूजा देशमुख, अरुणा देशमुख, कल्पना देशमुख आणि महिला उपस्थित होत्या.
या बैठकीत महिला बचत गटांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. या वेळी समन्वय अधिकारी बोरटे यांनी सांगितले की, गरीब महिलांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महिला बचत गटांना पहिल्या तीन महिन्यांनंतर 15 हजार आणि सहा महिन्यांनंतर एक लाखांचे अर्थसहाय्य शासनातर्फे केले जाणार आहे. एकही हफ्ता न चुकविता त्याची परतफेड केल्यास हे पैसे शुन्य टक्के दराने वापरायला मिळतील. रत्नप्रभा घरत यांनीही या सुवर्णसंधीचा महिलांनी लाभ घेऊन स्वत:सह कुटुंबाची उन्नती साधावी, असे आवाहन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply