Breaking News

सोमवंशीय माळी समाजासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून सात लाखांचा निधी मंजूर

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड शहरातील सोमवंशीय माळी समाजासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीने जिल्हा नियोजन मंडळाकडून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर करण्यात आला असून, तो सोमवंशीय माळी समाजाच्या सभागृहातील स्लॅबवर पत्र्याची शेड उभारण्यासाठी देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती सांगताना अ‍ॅड. मोहिते म्हणाले की, समाजाची मागणी होती त्याप्रमाणे सात लाखांचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित रक्कमसुद्धा देण्यास आम्ही वचनबद्ध असून, लवकरच हा निधी प्राप्त करून दिला जाईल, असे मी समाजाला आश्वासित करतो. याबद्दल शेगवाडा माळी समाजाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे, तर भाजपच्या माध्यमातून समाजासाठी निधी मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे यांनी बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानले. सोमवंशीय माळी समाजासाठी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या रकमेच्या आदेशाची प्रत अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते सुधीर पाटील यांना देण्यात आली. या वेळी भाजप-मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, सरचिटणीस अ‍ॅड. परेश देशमुख यांच्यासह प्रवीण भायदे, अजित कोर्लेकर, सुशील ठाकूर, मनोज भायदे, अरविंद गायकर, अण्णा कंधारे आदी उपस्थित होते.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply