सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन
माय लाईफ माय योगा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
पनवेल ः प्रतिनिधी – समाजात मोठे होताना आपण समाजाचे देणेदार लागतो ही भावना खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत करते, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 25) येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ’माय लाईफ माय योगा’वर आधारित माय लाईफ माय योगा रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धा तसेच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा भारतीय जनता पक्ष पनवेल प्रभाग क्रमांक 19 तर्फे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडला. त्या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर बोलत होते.
या सोहळ्यास ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, भाजपचे शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक राजू सोनी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेविका रुचिता लोंढे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी आदी उपस्थित होते. सभागृह नेते परेश ठाकूर पुढे म्हणाले की, मार्च महिन्यात कोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगावर संकट आणून हाहाकार माजविला. अनेक प्रगत देशांनाही त्यापुढे काहीही करता आले नाही. आपल्या देशाची जगातील दोन नंबरची लोकसंख्या लक्षात घेता आपल्या देशावर खूप मोठे संकट होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळेवर योग्य त्या उपाययोजना आणि देशातील नागरिकांना आधार देण्याचे काम केले. त्यामुळे खर्या अर्थाने आपल्या देशावरील संकट दूर झाले, असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नमूद केले.
कोरोनाचे संकट आल्याने अनेक गरीब, मोलमजुरी करणार्या नागरिकांचे अतोनात हाल झाले. अशा परिस्थितीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने लोकांना मदतीचा हात दिला. तीन लाखांपेक्षा जास्त अन्नधान्य पॅकेट्स, मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दीड लाखाहून अधिक जणांना तयार भोजन, तसेच मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम औषधे अशी विविध प्रकारची मदत करण्यात आली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोनाच्या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करून दिलासा दिला. (पान 2 वर..)
त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा ’कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला, असे सांगताच उपस्थित स्पर्धक व पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन करीत त्यांच्याप्रति आदर व्यक्त केला.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत पनवेलकर भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळेच सर्व उपक्रम यशस्वी होत आहेत. यापुढेही अशा विविध उपक्रमांत आपला सहभाग वाढवावा, असे आवाहनही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन चिन्मय समेळ, पवित्रा शेरावत, मयूर यांनी, तर सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले.
ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे विजेते
सात वर्षांखालील मुले गट (भाषा मराठी)
प्रथम क्रमांक – विहान पाटील
द्वितीय क्रमांक – अर्णव मयूर जोशी
सात वर्षांखालील मुली गट (भाषा मराठी)
प्रथम क्रमांक – संयुक्ता संदीप शेलार
द्वितीय क्रमांक – ईश्वरी विनय सोनटक्के
सात वर्षांखालील मुली गट (भाषा इंग्रजी)
प्रथम क्रमांक – सानवी सिद्धय साईकर
आठ ते 12 वर्षे मुले गट (भाषा मराठी)
प्रथम क्रमांक – संस्कार सचिन पाटील
द्वितीय क्रमांक – देवराज नितीन हांडे
तृतीय क्रमांक – अबीर प्रणव बवाले
आठ ते 12 वर्षे मुली गट (भाषा मराठी)
प्रथम क्रमांक – निर्भया अभय सहस्त्रबुद्धे
द्वितीय क्रमांक – गार्गी महेश म्हात्रे
तृतीय क्रमांक – चिन्मयी शैलेश भिडे
आठ ते 12 वर्षे मुली गट (भाषा इंग्रजी)
प्रथम क्रमांक – रिशीका बांठिया
द्वितीय क्रमांक – करिष्मा विनोद पवार
माय लाईफ माय योगा रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धेचे विजेते
12 ते 21 वर्षे पुरुष गट
प्रथम क्रमांक – देवराज पाटील
द्वितीय क्रमांक – आदित्य कुलथे
तृतीय क्रमांक – दीपांशू चव्हाण
उत्तेजनार्थ – वेद गाला, वेदांत रमेश
12 ते 21 वर्षे महिला गट
प्रथम क्रमांक – अंगश्री एस.
द्वितीय क्रमांक – प्रियांका जोमराई
तृतीय क्रमांक – जयश्री लांडे
उत्तेजनार्थ – जिया डागा, मनस्वी
21 ते 35 वर्षे पुरुष गट
प्रथम क्रमांक – कुलदीप सोढे
द्वितीय क्रमांक – अताऊर मंडल
तृतीय क्रमांक – नचिकेत सुगवेकर
उत्तेजनार्थ – संकेत पाटील
21 ते 35 वर्षे महिला गट
प्रथम क्रमांक – प्रिया सिंग
द्वितीय क्रमांक – सारिका रांका
तृतीय क्रमांक – गायत्री कार्ले
उत्तेजनार्थ – मोनिका निकम, साधना फुलोरे
35 वर्षांवरील पुरुष गट
प्रथम क्रमांक – संतोष शिर्के
द्वितीय क्रमांक – हितेश चिप्पानी
तृतीय क्रमांक – सूर्यकांत फडके
उत्तेजनार्थ – सुनील गाडगीळ, गजानन काळे
35 वर्षांवरील महिला गट
प्रथम क्रमांक – सरिता पाटकर
द्वितीय क्रमांक – अंजली देवानी
तृतीय क्रमांक – संजना सकपाळ उत्तेजनार्थ – ममता शुक्ला, ज्योती चौहान.