Breaking News

राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत महाराष्ट्र तृतीय स्थानी

नागोठणे : प्रतिनिधी

अ‍ॅम्युचअर लगोरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने, दिल्ली लगोरी संघटनेच्या वतीने लगोरीचे जनक क्रीडारत्न स्व. संतोष गुरव यांच्या जयंतीनिमित्त आठवी सिनियर राष्ट्रीय लगोरी अजिंक्यपद व एशियन निवड चाचणी स्पर्धा नुकतीच नवी दिल्ली येथे झाली. या स्पर्धेत 15 राज्य सहभागी झाले होते. या स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचे उद्घाटन नवी दिल्लीच्या महापौर सुमन डागर, भारतीय लगोरी संघटनेचे अध्यक्ष संदीप गुरव (महाराष्ट्र राज्य एकलव्य पुरस्कार विजेते) यांच्या हस्ते स्व. संतोष गुरव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत दीप प्रज्वलन, तसेच लगोरी फोडून करण्यात आले. स्पर्धेत पुरुषांच्या गटात दिल्ली संघाला विजेते पद, तर उपविजेतेपद पाँडेचरी, तर तृतीय स्थान महाराष्ट्र व तेलंगणा संघाला मिळाले. महिलांमध्ये सुद्धा दिल्ली संघाने सुवर्ण कामगिरी करीत विजेतेपद मिळविले. उपविजेतेपद तमिळनाडू, तर तृतीय स्थान दिल्ली एनसीआर व चंदीगड संघाला मिळाले. टार्गेट लगोरी प्रकारात गोवा संघाला प्रथम, छत्तीसगड संघाला द्वितीय, तर मिक्स डबल मध्ये पॉण्डेचेरीने अजिंक्यपद मिळविले. या स्पर्धेतून निवडलेला संघ, थायलंड येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय लगोरी स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंची नावे- सिद्धांत संतोष गुरव, भूषण राऊत, दिवेश महाकाल, रोहन काळे, हेरंब गर्दे, कुणाल जाधव, रितेश पेणोरे, प्रियांशू खोडके, प्रशिक अंबाडे, अर्सलान सय्यद, स्वप्नील मालेवर, साईराज वीटकरे आणि प्रतीक बी. संघ प्रशिक्षक संजय

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply