
पनवेल : वार्ताहर
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे वंदे मातरम स्कूल, जोहे या शाळेला शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खेळांचे साहित्य, लायब्ररी, वॉटर फिल्टर, डेस्क, बेंचेस देऊन ही शाळा हॅपी स्कूल करण्यात आली. या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष सुनील लघाटे, सचिव गणेश साठे, अमर म्हात्रे, शिरिष पिंपळकर, योगेश वैद्य यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.