कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट आणि उत्कृष्ट गणेशमूर्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. उत्कृष्ट घरगुती गणेश मूर्ती स्पर्धेत प्रदीप जोशी यांनी तर घरगुती सजावट स्पर्धेत मयुरेश चंचे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून प्रमोद दहिवलीकर यांची निवड करण्यात आली. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत 16, तर गणेशमूर्ती स्पर्धेत 30 स्पर्धकांनी भाग घेतला होता. परीक्षक अनंत कर्वे, बल्लाळ जोशी आणि यशवंत दीक्षित यांनी स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण केले. स्पर्धेत सहभागी गणेशभक्तांचे तसेच पारितोषिक विजेत्यांचे सरपंच जान्हवी साळुंखे आणि उपसरपंच अंकुश शेळके यांनी अभिनंदन केले.
सर्व विजेत्यांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशघाट येथे होणार्या कार्यक्रमात पारितोषिके देऊन सन्मानित केले जाणार आहे. रोख आणि सन्मानचिन्ह स्वरूपात ही पारितोषिके असून सर्व नागरिकांसमोर या बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे.
-जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत
स्पर्धेचा निकाल-
उत्कृष्ट घरगुती गणेशमूर्ती- 1- प्रदीप अनंत जोशी 2- मारुती महादू मोरे 3- ओमकार संतोष चंचे
उत्तेजनार्थ- रमेश दत्तात्रय कोतेकर
उत्कृष्ट घरगुती सजावट- 1- मयुरेश विठ्ठल चंचे 2- विनायक पांडुरंग शिनारे 3- तन्मय निनाद साळुंखे
उत्तेजनार्थ- 1- कचरू देहू बदे 2- प्रभंजन प्रभाकर गायकवाड
उत्कृष्ट मूर्तिकार- 1- प्रमोद दहिवलीकर 2- योगेश मोरे 3- मनोहर मोडक आणि मिलिंद दहिवलीकर