Breaking News

नानवेल दीपगृह बंद; रात्री दिशा समजत नसल्याने होड्या भरकटल्या

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यात कोर्लईजवळ मणेरी तर दिघी गावानजीक नानवेल ही दोन दीपगृहे आहेत. त्यातील नानवेल येथील दीपगृह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. तेथील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मच्छीमारांच्या होड्या भलत्याच ठिकाणी भरकटल्या जात आहेत. खोल समुद्रात जाणार्‍या बोटींना दिशा दाखविण्यासाठी दीपगृह मार्गदर्शक ठरतात. रात्रीच्या वेळी दीपगृहातील दिवे प्रखरतेने प्रज्वलित होत असल्याने समुद्रातील होड्यांना दिशा समजते. मच्छीमारांना आपण कोणत्या दिशेला आहोत याचे आकलन होत असते. सध्या मुरूडच्या समुद्रात ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख दिसून येतो. पाऊसही पडत आहे. अशा वेळी मुरूड परिसरातील मच्छीमारांना मणेरी व  नानवेल या दीपगृहांचा मोठा उपयोग होतो, मात्र त्यापैकी नानवेल दीपगृहातील दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे मच्छीमारांना दिशा समजत नसल्याने बोटी भरकटल्याच्या घटना घडत आहेत. नानवेल दीपगृहातील लाइट हाऊस तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी येथील मच्छीमार सोसायट्यांनी केली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply