पेण : प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीत रिंगरोड उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून 53 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातून करण्यात येणार्या 11
विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयोजित केले आहे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
रिंगरोडमधील विविध विकासकामांसाठी निधी मिळावा याकरिता माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बाह्य रस्ते विकास
योजनेंतर्गत 53 कोटी रुपयांचा निधी पेण नगर परिषदेला दिला आहे.
पेण नगर परिषद हद्दीतील विकासकामे
कामाचे नाव : मंजूर निधी
विकास रस्ता तयार करणे
आगरी समाज हॉल ते मोतीराम तलाव : तीन कोटी,
मोतीराम तलाव ते सर्व्हे नं.392 (कॅनल) : 4.98 कोटी,
सर्व्हे नं.392(कॅनल) ते बोरगाव रस्ता : 4.97 कोटी,
बोरगाव रस्ता ते हिमास्पंन पाइप कंपनी : 4.99 कोटी,
राष्ट्रीय महामार्ग 17 ते भुंडा पूल : 4.98 कोटी,
पाटील गणपती कारखाना ते स्मशानभूमी : 4.99 कोटी,
विश्वेश्वर मंदिर ते नगर परिषद जॅकवेल : 4.99 कोटी,
न. प. जॅकवेल ते आरटीओ कार्यालय : 4.99 कोटी,
अंतोरा फाटा ते पं.स. कार्यालय ते महामार्ग : 14.99 कोटी