पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेल प्रभाग 20मधील पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले.
नवीन पनवेल प्रभाग 20मधील रेल्वे गेटकडे जाणार्या पोदी नं. 1 ते हनुमान मंदिर हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी पनवेल नगरपालिकेकडे हा रस्ता करण्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सात लाख रुपये नगरोत्थान निधीतून मंजूर करण्यात आले.
या रस्त्याचे भूमिपूजन गुरुवारी 12 सेप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बेहरा, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, जयवंत महामुनी, सामाजिक कार्यकर्ते घनःश्याम भुजबळ, जयराम मुंबईकर, बाळा मोरे, भरत भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी उपनगराध्यक्ष जयवंत महामुनी यांचे परेश ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper