Breaking News

धुमाळ पितापुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग भाजपत इनकमिंग सुरूच

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ आणि अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास पक्षाचे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप, कृष्णा कोबनाक, अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, तालुका सरचिटणीस परशुराम म्हात्रे, मिलिंद पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग उपस्थित होते. शेकापबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने युती केल्यामुळे इथे पक्षात काम करायला संधी राहिलेली नाही, यापुढेही मिळेल असे दिसत नाही. सुनील तटकरे यांचे अनेक सहकारी पक्ष सोडून गेले, परंतु निष्ठेने पक्षाबरोबर राहिलो. आता पक्ष वाढवायला संधीच मिळत नाही. अशा वेळी भाजप हाच आशेचा किरण दिसतो आहे, असे प्रकाश धुमाळ यांनी या वेळी सांगितले. प्रकाश धुमाळ व मनोज धुमाळ यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत आपल्या पदाचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिले होते. ते कुठला पक्ष निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर गुरुवारी दोघेही भाजपवासी झाले. या वेळी शहापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भानुदास पाटील, संजय पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. याच कार्यक्रमात मुरूड तालुक्यातील काशिद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल झाले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply