Breaking News

नावडे येथील गणेश घाटाची होणार दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानार्तगत नावडे येथील प्रभाग क्रमांक 2 येथे गणेश घाट दुरुस्त करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 14) करण्यात आले. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन 2018-19 अंतर्गत पनवेल महापालिका हद्दीमध्ये अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत नावडेमधील प्रभाग क्रमांक 2 येथील गणेश घाट दुरुस्तीच्या कामाचे करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे,  रवींद्र खानावकर, राम खानावकर, लक्ष्मण खानावकर, संदीप खानावकर, प्रभाकर खानावकर, राम खुटारकर, निलेश खुटारकर, संतोष म्हात्रे, अरूण गवळी, विनोद खानावकर, विशाल खानावकर, सुशांत खानावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply