




पनवेल ः भाजपच्या तालुका मंडलप्रमुख संघटकपदी प्रभाकर जोशी, चिटणीसपदी जयदास तेलवणे आणि ओवे शहर अध्यक्षपदी सचिन वास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि अरुणशेठ भगत यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते मोहन म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, खारघर शहर प्रसिद्धीप्रमुख गुरुनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते.