उरण : बातमीदार
चौथी अॅथलेटिक्स नॅशनल मास्टर्स गेम्स स्पर्धा तिरुवनंतपुरम केरळ येथे 18 ते 22 मे दरम्यान झाली. या स्पर्धेत उरणच्या स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक राज्यातील तब्बल 5,500 खेळाडूंनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उरणमधील योगा विथ पूनमच्या योगशिक्षिका सहभागी झाले होते. या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावून सुयश प्राप्त केले आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. योगाशिक्षक राम चौहान यांनी गोळाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक व भालाफेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला आहे.राम चौहान हे उरण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. योग शिक्षिका पुनम चौहान यांनी 10 किलोमीटर धावणे प्रथम क्रमांक तर 1500 मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला आहे. पूनम चौहान या उत्तम योगा शिक्षिका आहेत.उरणमधील दोन्ही शिक्षकांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.