Breaking News

कुहीरेत साकारले भव्य देखणे शिवस्मारक

पाली : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील कुहीरे गावात गावदेवी क्रीडा मंडळ व महिला मंडळाच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून भव्य व देखणे शिवस्मारक साकारले आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळच मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि.23) या शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. गावात काढण्यात आलेल्या शिवप्रतिमेच्या मिरवणुकीत भगवे फेटे परिधान करीत लहान मुले, महिला, पुरुष, युवक सहभागी झाले होते. यावेळी शिवरायांच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हभप दत्तात्रेय महाराज जवके यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ आणि हभप सुभाष महाराज पाटील यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. या वेळी गावदेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गणपत इंद्रे, उपाध्यक्ष सतिष जवके, सचिव तुकाराम वाळंज, अजय शिगवण, गणेश जवके, राजेंद्र वाळंज, विठोबा दंत, मनोहर वाळंज,, हिराचंद बोंडेकर, परशुराम जवके, अनिल जवके, चंद्रकांत वाळंज, लक्ष्मण दंत, गपतशेठ बोंडेकर, चंद्रकांत वाळंज, लक्ष्मण दंत, भरत रेवाळे, चंद्रकांत रेवाळे, दत्तात्रेय जवके, सिताराम जवके, समाधान गायकवाड, अनिकेत इंद्रे, निलेश रेवाळे, सुरेंद्र दंत, जनार्दन इंद्रे, जनार्दन जवके, हिरामण बोंडेकर, हरेश शिंदे, रुपेश दंत, ओमकार वाळंज, भरत जवके, रोशन वाळंज, दिपक रेवाळे, ओमकार वाळंज, सागर गायकवाड, मारुती बोंडेकर, उदय रेवाळे, रत्नकांत जवके आदिंसह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply