Breaking News

भाजपच्या संघटन पर्वात सहभागी व्हा!

राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी यांचे आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रभावना, संघटन आणि देशाच्या विकासासाठी सदैव कार्यरत असलेला भारतीय जनता पक्ष म्हणजे देशसेवा करणारे एक कुटुंब आहे. सदस्य नोंदणीच्या अनुषंगाने या कुटुंबात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करण्यासाठी भाजप संघटन पर्व 2019 अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या संघटन पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश सचिव व अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख संजय उपाध्याय, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, उपमहापौर विक्रांत पाटील, विधानसभा विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.

डॉ. चतुर्वेदी यांनी सर्वप्रथम कारगिल विजयी दिनानिमित्त शहिदांना अभिवादन केले. त्यांनी पत्रकारांशी संवाद करताना सांगितले की, भाजप हा समाजाच्या विकासासाठी काम करणारा लोककल्याणकारी पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीने संपूर्ण देशात उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पक्षाला जनाधार वाढत आहे. मागील वर्षी 11 कोटी 50 लाख सदस्य संख्या होऊन भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष झाला. लोकसभा निवडणुकीत मिळालेले सुवर्णयश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्या अनुषंगाने या वर्षी सदस्य संख्येत वाढ करण्याचा संकल्प संघटन पर्वच्या माध्यमातून करण्यात आला असून, महाराष्ट्रात आणखी 50 लाख सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी बूथ अशक्त आहेत त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन बूथ शक्तिशाली करण्याचे काम या अभियानातून केले जाणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष काम करीत असून, पक्षाच्या कार्यक्रमासोबत सामाजिक उपक्रम राबविण्याची उद्दिष्ट्ये ठेवून आम्ही सारे कार्यरत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे ध्येय -आमदार प्रशांत ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत,  नागरिकापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम भाजपच्या माध्यमातून केले जात आहे. भाजपने सदस्यता कार्यक्रम सार्वत्रिक आणि समावेशक करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार 8980808080 या क्रमांकावर मिस्ड कॉल करून सदस्य होऊन या पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply