Breaking News

खारघर येथे ओपन जीमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महापालिकेच्या नगरसेविका आरती नवघरे यांच्या नगरसेवक निधीतून खारघर येथे ओपन जीमचे साहित्य सेक्टर-2 मधील गार्डनमध्ये बसवण्यात आले. या ओपन जीमच्या साहित्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) करण्यात आले.

खारघर शहरातील सेक्टर-2 या ठिकाणी प्लॉट क्रमांक-5 मधील गार्डनमध्ये गेले अनेक दिवस ओपन जिम बसवावी, अशी मागणी अनेक संघटना, ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवासी वेळोवेळी करत होते. या मागणीची दखल घेत नगरसेविका आरती नवघरे यांच्या नगरसेवक निधीच्या माध्यमातून ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे.या साहित्यांच्या उद्घाटनाच्या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेविका अनिता पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, संध्या शारबिद्रे, गीता चौधरी, भाजप नेते वासुदेव पाटील, मनोज शारबिद्रे, प्रभाकर बांगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ओपन जिमचे साहित्य खारघरमधील नागरिकांच्या सेवेकरिता उपलब्ध झाले आहे, त्याबद्दल नागरिकांनी नगरसेविका आरती नवघरे यांचे आभर मानले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply