पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाळण्यात येणार्या स्वच्छता आठवड्याची सुरुवात सोमवारी (दि. 16) करण्यात आली. सकाळी 11 वाजता स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली काढून नागरिकांत स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली. ’स्वच्छता हीच सेवा’ मानून मध्यरेल्वे मध्य रेल्वे, आगरवाल समाज पनवेल वेल्फेअर असोशिएशन, लायन्स क्लब आणि न्यू होरायजन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पनवेल रेल्वे स्टेशनवर रॅली काढली. या वेळी प्रवाशांना रिसायकल न होणारे प्लॅस्टिक न वापरण्याविषयी जागृत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगणारे फलक या वेळी हातात घेतले होते. त्यानंतर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.