Breaking News

अंकुर घरतला मानाची गदा

 अलिबाग ः प्रतिनिधी

अटीतटीच्या कुस्तीत एकचाक डावावर प्रतिस्पर्ध्याला असमान दाखवत टाकादेवी स्पोर्ट्स क्लबचा मल्ल अंकुर घरतने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली.

सोलापूर जिल्ह्यातील मु. मेडद, ता. माळशिरस येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती मैदानात टाकादेवी स्पोर्ट्स क्लब, मांडवाचा पैलवान अंकुर अशोक घरत याने कोल्हापूरच्या सचिन पाटीलला पराभूत करून मानाची गदा पटकावली. 10 मिनिटे चाललेल्या  अटीतटीच्या कुस्तीमध्ये एकचाक डावावर प्रतिस्पर्ध्याला त्याने आसमान दाखविले.

अंकुर टाकादेवी स्पोर्ट्स क्लब मांडवाचा पैलवान असून कारकिर्दीत मुंबई विद्यापीठाची तीन सुवर्णपदके जिंकून राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचा मानकरी आहे. 2014 साली झालेल्या कोकण केसरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून कोकण केसरी किताबाचा मानकरी ठरला. सध्या मांडवाच्या तालमीत वस्ताद, केशवराव पाटील तसेच सौरभ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या 97 किलो वजनी गटाची तो तयारी करीत आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply