पनवेलमध्ये 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन
अलिबाग ः जिमाका
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांचे विद्यमाने, रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता के. व्ही. कन्याशाळा (ज्युनिअर कॉलेज) वडाळा तळावाजवळ, (ता. पनवेल, जि. रायगड) येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या कंपन्यारना 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवी, पदवीधर (रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणार्या उमेदवारांनी या विभागाच्या हीींिीं://ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन ठेक्षसरी चशश्रर्रींर झरर्पींशश्र यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे अॅप्लाय करावे. यामध्ये काही अडचण आल्यास किंवा सहाय्यासाठी हेल्पलाईन 18602330133 किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजूस उपलब्ध असलेल्या ठेक्षसरी उहरीं कशश्रश्रिळपश या सुविधेचा उपयोग करावा. तरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी व प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाअंतर्गत प्रशिक्षित लाभार्थी, उमेदवार यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतिसह वरील ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पनवेल यांनी केले आहे.