पनवेल ः रामप्रहर वृत्त
लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत इंग्रजी माध्यम, नवीन पनवेलच्या मनाली चिलेकर या (इ. 7वी)च्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपली गुणवत्ता सिद्ध करीत तिने रायगड जिल्हा चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे. मनालीचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक़, मार्गदर्शक शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.