Breaking News

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ‘शंभरनंबरी’ यश

खारघर ः शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचे भाग्यश्री शरद सुरासे (99.80%), अर्णव मेश्राम (99.40%), जश मणियार (98.60%) आणि तेजस कदम (98.60%) हे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. याचबरोबर 25 मुलांना 95 टक्क्यांच्या वर, 76 मुलांना 90 टक्क्यांच्या वर आणि 173 मुलांना 75 टक्क्यांच्या वर गुण मिळाले असून सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या धवल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व विद्यार्थी, तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले. या वेळी व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, अर्चना ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी, अमोघ ठाकूर उपस्थित होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply