पनवेल : बातमीदार
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांच्या विद्यमाने रविवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता के. व्ही.कन्याशाळा (ज्युनिअर कॉलेज) येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या कंपन्याना दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर, सदर रोजगार मेळाव्याच्या दिवशी उपस्थित उद्योजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणार्या उमेदवारांनी या विभागाच्या हीींिीं://ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे.