म्हसळ्यात फळे व बिस्कीटवाटप


म्हसळा : प्रातिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा भाजपतर्फे मंगळवारी (दि. 17) तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी व म्हसळा आदिवासीवाडी येथील अंगणवाडीमधील मुलांना तसेच म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करण्यात आली.
जिल्हा नियोजन योजनेंतर्गत 12 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या घणेरीकोंड रस्त्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.
भाजपचे तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, तालुका सरचिटणीस मंगेश म्हशिलकर, प्रकाश रायकर, तुकाराम पाटील, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे, म्हसळा तालुका अध्यक्ष महिला मोर्चा मीना टिंगरे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शरद चव्हाण, शहर अध्यक्ष मंगेश मुंडे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील शिंदे, अनुसूचित जमाती मोर्चा तालुका अध्यक्ष मनोहर जाधव, शरद कांबळे, योगेश महागावकर, अमोल गणवे, सुबोध पाटील, रावजी घाणेकर आदी पदाधिकार्यांसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेरळमध्ये नेत्रचिकित्सा शिबिर

कर्जत : बातमीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नेरळ शहर भाजप आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहर भाजप कार्यालयात बुधवारी (दि. 18) नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांचा 69वा वाढदिवस असल्याने या शिबिरात 69 रुग्णांची तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे यांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात ट्रस्टच्या डॉ. प्रियंका कशेळकर यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. त्यांना सहाय्यक वृषाली पाटील, भगवान पोळ, प्रकाश पाटील आदींनी सहकार्य केले. भाजप प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण विभागीय संयोजक नितीन कांदळगावकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या 92व्या नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी संयोजक नितीन कंदळगावकर, भाजपच्या जिल्हा चिटणीस समिधा टिल्लू, कर्जत तालुका सरचिटणीस प्रवीण पोलकम, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, सरचिटणीस राहुल मुकणे, महिला मोर्चाच्या नेरळ अध्यक्ष नीता कवाडकर, सरचिटणीस नम्रता कांदळगावकर, कर्जत पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी, संतोष शिंगाडे, श्रद्धा कराळे, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सुगवेकर, अरुण धारप, मिलिंद साने, संभाजी गरुड, सुशील सुर्वे तसेच मोहन कुलकर्णी, राजू वैद्य, महेश खराटे, प्रकाश पेमारे, नरेंद्र कराळे, सुरेखा पोलकम, अरुण पाटील, भडसावळे आदी उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या प्लास्टिकबंदीला पाठिंबा देण्यासाठी शपथ घेण्यात आली.