Saturday , March 25 2023
Breaking News

पनवेलमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात

माजी नगरसेविका दर्शना भोईर यांचा पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीत येणार्‍या लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी येथे पावसाळापूर्व नालेसफाई कामास सुरुवात झाली आहे. या कामी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
पनवेलमधील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीमध्ये अरुंद रस्ते असल्याने अंतर्गत नालेसफाई वेळोवेळी करणे गरजेचे असते. पावसाळ्यात या वसाहतीमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेत पनवेल महापालिकेमार्फत लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीमधील पावसाळापूर्व नालेसफाई करवून घेतली. दरम्यान, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊन जनजीवन विस्कळीत होणार नसल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नालेसफाईच्या पाहणीवेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह पनवेल महापालिकेचे एसआय महेंद्र भोईर, संतोष ढगे, चंद्रकांत मंजुळे, मनिष निपाणीकर, भरत जाधव, लखन जाधव, निलेश धोत्रे, विकी लहाने, नितेश मंजुळे आदी उपस्थित होते.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply