Breaking News

व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडव्हान्स सर्च

व्हॉट्सअ‍ॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. या अ‍ॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपही सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते. आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडव्हान्स सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. अ‍ॅडव्हान्स सर्चच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गवारीनुसार शोध घेता येणार आहे. व्हाट्सअ‍ॅपबद्दल माहिती देणार्‍या थइशींरखपषे या संकेतस्थळाने याबाबबत माहिती दिली आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर कुणीही युजर अथवा ग्रुप यांना सर्च बारमधून शोधू शकतो, मात्र व्हाट्सअ‍ॅप आता या सर्चची व्याप्ती वाढवणार आहे. याच्या अंतर्गत युजरला विविध वर्गवारींच्या माध्यमातून शोध घेता येणार आहे. यात युजर आणि ग्रुपसोबत विविध मीडिया फाईल्स शोधता येतील. यात प्रतिमा, व्हिडीओ, जीआयएफ, ऑडिओ, डॉक्युमेंट, लिंक्स आदींचा समावेश असणार आहे. सध्या हे फिचर आयओएस प्रणालीच्या बीटा (प्रयोगात्मक) युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. लवकरच अँड्रॉइड युजर्ससाठीही उपलब्ध होणार आहे. अ‍ॅडव्हान्स सर्चमध्ये युजर्स हव्या त्या फाईल्स शोधू शकतो. यासाठी युजरला संबंधित आयकॉनवर क्लिक करावे लागणार आहे. याशिवाय यात सर्च हिस्ट्रीदेखील दिसणार आहे. अर्थात ही हिस्ट्री क्लिअर करण्याची सुविधासुद्धा यात देण्यात येणार आहे. डार्क मोडमुळे युजर्सच्या डोळ्याला मोबाईल स्क्रीनमुळे होणारा त्रास कमी होणार आहे. सध्या हा मोड इतर सोशल मीडिया, मोबाईल आणि वेबसाईटस यामध्ये प्रसिद्ध आहे, मात्र आता तो व्हॉटसअ‍ॅपवर येणार असल्याने युजर्ससाठी ते अतिशय फायद्याचे ठरणार आहे. रात्रीच्या वेळी मोबाईलवर पाहताना डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी प्रामुख्याने या मोडचा उपयोग करण्यात येतो. याबाबतच्या चाचण्या सुरू असून लवकरच तो प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply