Monday , October 2 2023
Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात पाण्यासाठी उपाययोजना

पाईपलाईन कामाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून एमजेपीकडून नवीन पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत नवीन 14 इंचाची पाईपलाईन मार्केट यार्ड येथे असलेल्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. 13) महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. येथील नागरिकांना भविष्य काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, याकारीता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अमादार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपायोजना करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील मार्केट यार्ड येथे अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीसाठी एमजेपीकडून नवीन पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने नवीन 14 इंचाची पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून या कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या पाण्याच्या पाईपलाईनमुळे कल्पतरू परिसरात असणार्‍या अनेक सोसायट्यांना याचा फायदा होणार आहे. या वेळी माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, पनवेल किसान मोर्चाचे अध्यक्ष रुपेश परदेशी, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, तुषार कापरे, ठेकेदार मनोज खांदेशे, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply