Breaking News

महाडमध्ये आढळला तिसरा कोरोनाबाधित

महाड, माणगाव : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील कोकरे तर्फे नाते येथील एका वृद्धाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या 63 वर्षीय वृद्धाला पॅरेलिसिसच्या उपचारासाठी माणगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या नव्या रुग्णामुळे महाडमधील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन झाली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही रुग्ण विविध आजारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी गेल्यानंतर त्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकरे गावातील कोरोनाचा रुग्ण शेतकरी असून, या व्यक्तीला पॅरेलिसिस झाल्याने माणगावमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाने प्रवासासाठी वापरलेली जीप पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply