पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना दिल्ली येथे तुर्कीच्या राजदूतांच्या हस्ते ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 70 देशांतील आदर्श शिक्षकांना देण्यात आला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून महाविद्यालयात ज्ञानपेटी ठेवून त्यामध्ये विद्यार्थ्यांना लागणार्या शालोपयोगी वस्तू जमा करून त्या गरीब विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. महाविद्यालयाच्या आवारात तुळशीची रोपे लावून ऑक्सिजन पार्क तयार करून पर्यावरणाच्या रक्षणाचा आदर्श आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवला होता.