Breaking News

सार्वजनिक आरोग्य जपणे आवश्यक

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे प्रतिपादन

पनवेल ः वार्ताहर  
आपण सार्वजनिक आरोग्यावर जास्त भर द्यायला हवा. सध्या भारतात काहीच संस्थांमध्ये सार्वजनिक आरोग्य हा विषय शिकविला जातो. त्यापैकी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीएचटीआर) महत्त्वाचे काम करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शनिवारी (दि. 22) केले. ‘एनआयपीएचटीआर’च्या नवीन पनवेल येथील संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, ‘एनआयपीएचटीआर’चे संचालक प्रा. डॉ. दीपक राऊत आदी उपस्थित होते. या वेळी निवासी कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात येणार्‍या इमारतीचे भूमिपूजनही डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले. जर आपण सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत बौद्धिक गोष्टी जोडू शकलो, तर यात लक्षणीय सुधारणा होऊ शकतील, ज्याचा सर्वसामान्यांना जास्त फायदा होईल, असे ते म्हणाले.
आयुष्यमान भारत योजनेबद्दल बोलताना डॉ. हर्ष वर्धन यांनी ही योजना आम्ही चांगल्या प्रकारे राबवत असून, या योजनेत आतापर्यंत तब्बल 86 लाख जणांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती दिली.
प्रा. डॉ. दीपक राऊत यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. नवीन संकुलामुळे येथे येणार्‍या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यात जून 2019मधील सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर कोर्सच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply