Breaking News

महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांचे प्रयत्न

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचअनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 10 टक्के निधीतून व पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रयत्नाने गव्हाण विभागातील महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप बुधवारी (दि. 3) करण्यात आले. गव्हाण-शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या पाठपुराव्यामुळे महिला व बालकल्याण विभाग निधी अंतर्गत शिवाजीनगर येथील प्राथमिक शाळेत गव्हाण पंचायत समिती गणातून शिवाजीनगर येथील आनंदी बाबूराव ठाकूर यांना घरघंटी, अंजली रोशन ठाकूर यांना शिलाई मशीन, वहाळ पंचायत समिती गणातून बामणडोंगरी येथील कुसूम गजानन गोंधळी यांना घरघंटी देण्यात आली.

या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत म्हणाल्या की, समितीच्या माध्यमातून नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असतो. यामध्ये महिला सबलीकरणासाठी दरवर्षी ज्या कोणत्या योजना आहेत त्यांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना मिळवून देत असते. तसेच अपंग कल्याण निधी, महिला व बालकल्याण निधी, गावातील पायाभूत सुविधांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आणण्याचा माझा प्रयत्न असतो. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या मार्गदशनाखाली मी कार्य करीत असते. तसेच पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून आत्ता पर्यत्त करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेऊन पुढील काळात मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती दिली.

भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत म्हणाले की, पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत यांनी सरपंच असल्यापासून गावासाठी अनेक विकासकामे केली. महिलांना आपल्या पायावर  उभे करण्यासाठी स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप केले हे खूप कौतुकास्पद आहे. तसेच प्रत्येक कार्यासाठी पुढाकाराने त्या सहभागी होत असतात.

प्रेरणादायी व उत्स्फूर्त असे त्यांचे व्यक्तीमत्व असलेल्या रत्नाताईंच्या कामांचे कौतुक करू तेवढे कमी आहे. या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, सदस्या योगीता भगत, पंच कमिटी उपाध्यक्ष वामन ठाकूर, तुलशीदास ठाकूर, ग्राम विकास अधिकारी एम. डी. पाटील, मुख्याध्यापीका सुजीता म्हात्रे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply