Breaking News

उरण महाविद्यालयात शिक्षक-पालक संघ स्थापन

उरण ः रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2019-2020साठीचा शिक्षक पालक संघ स्थापन करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून हा संघ निर्माण करण्यात आला. पालक संघाचे अध्यक्ष म्हणून शेखर पडते, उपाध्यक्ष म्हणून प्रताप कन्हेकर, सचिव म्हणून संदीप पानरसे यांची निवड करण्यात आली. या पालक संघाचे सल्लागार महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा असणार आहेत, तसेच पालक संघाचे दस्य म्हणून जितेंद्र पाटील, मेघा कांबळे व पूजा मुकादम यांची निवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य के. ए. शामा यांनी महाविद्यालयातील सुविधांविषयीची माहिती सांगितली. प्रास्ताविक प्रा. एच. के. जगताप यांनी केले, तर पालक संघाच्या पदाधिकार्‍यांची निवड प्रा. एम. जी. लोणे यांनी केली. निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचे स्वागत प्राचार्य के. ए. शामा यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. डी. पी. हिंगमिरे यांनी केले, तर आभार प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करा -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना …

Leave a Reply