गव्हाण ः रामप्रहर वृत्त
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रस्ते वाहतूक व सुरक्षा या विषयावर आरएसपीचे देवेंद्र म्हात्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्या सााधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानात म्हात्रे यांनी विद्यार्थी व त्यांच्याकरवी पालकांनाही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. या वेळी विद्यालयाचे उपप्राचार्य राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, लॅबचे प्रमुख रवींद्र भोईर, क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर यांच्यासह सर्व रयत सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.