अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल).
- टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे?
अ. टाटा एलेक्सी आ. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)
इ. टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड ई. टाटा सन्स लिमिटेड
- आपल्या देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी कोणती?
अ. रिलायन्स इंडस्ट्रीज आ. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)
इ. इन्फोसिस ई. एल अॅड टी
- शेअर बाजाराच्या सेन्सेक्स इंडेक्समध्येकिती कंपन्यांचा समावेश आहे?
अ. 100 आ. 30
इ. 50 ई. 10
टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!