Breaking News

राष्ट्रवादीच्या यात्रेमुळे महाडमध्ये वाहतूक कोंडी

महाड : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची शनिवारी (दि. 21) किल्ले रायगड येथे सांगता झाली. त्यानंतर महाडमध्ये आलेल्या या यात्रेमुळे नागरिकांना पाच तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. या वेळी उपस्थित नेत्यांनी व्यासपीठावरून भारतमाता की जयच्या घोषणा देऊन भाजपच्या देश-धर्मप्रेमाची कॉपी केल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा किल्ले रायगडावरून महाड शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा झाली. या सभेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, आमदार संजय कदम, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, अमोल मिटकरी आदी नेते उपस्थित होते. या वेळी सभेस्थानी लोकांची उपस्थिती पाहता गर्दी खेचण्यात दोन्ही काँग्रेसचे नेते अपयशी ठरल्याचे दिसून आले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सांगता सभेमुळे महाडमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. नागरिक संतप्त झाल्यामुळे अखेर पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाहतूक सुरू करावी लागली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply