Breaking News

ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या सन्मानार्थ मोटरसायकल रॅली; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रियंका टीव्हीएस शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याच वेळी ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून देणार्‍या खेळाडूंच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या एओजी मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून रॅलीचा आरंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रियंका टीव्हीएसचे मालक फतेह लाल जैन यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास पनवेल इस्टेट कॉप सोसायटी अध्यक्ष विजय लोखंडे, संचालक सुनील सूचक, टीव्हीएस कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. मुदस्सर, सीएफओ सुबोध जैन, जीएम अरुणकुमार आदी उपस्थित होते. फतेह लाल जैन यांनी 11 वर्षांपूर्वी प्रियांका मोटर्सची सुरुवात केली आणि आज ही कंपनी नवी मुंबई आणि रायगडमधील आघाडीच्या दुचाकी एजन्सींपैकी एक आहे, तिचा विस्तार वाशी, पनवेल आणि खारघरमध्ये आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या रॅलीचे कौतुकही केले. दरम्यान, पनवेलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply