Breaking News

माथेरानमध्ये भाजप आयोजित नेत्रचिकित्सा शिबिर

197 रुग्णांची तपासणी, मोतीबिंदूचे 45 रुग्ण

कर्जत : बातमीदार

माथेरानमधील बी. जे. हॉस्पिटलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात तब्बल 197 रुग्णांची नेत्रचिकित्सा करण्यात आली, त्यातील 45 रुग्णांना मोतीबिंदू दोष आढळले असून त्यांच्यावर पनवेल येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि माथेरान भाजप यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या हस्ते झाले. या वेळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, अश्वपाल संघटनेच्या आशा कदम, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण प्रांत संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप माथेरान शहर अध्यक्ष विलास पाटील आदी उपस्थित होते.

शिबिरात डॉ. आदिल खान, डॉ. स्नेहा घरत, डॉ. स्वागता मुखर्जी, डॉ. स्नेहा रॉय, शिरीन मुल्ला आणि जनसंपर्क अधिकारी प्रकाश पाटील यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. भाजपचे कर्जत तालुका कार्यकारिणी सदस्य प्रवीण पोलकम, नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन, मिलिंद साने, महिला मोर्चाच्या कर्जत तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे, नेरळ सरचिटणीस नम्रता कांदळगावकर यांनी या शिबिराला भेट दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष विलास पाटील, शैलेंद्र दळवी, संजय भोसले, सुभाष भोसले, बाबू बर्गे, माजी नगरसेवक अरविंद शेलार, माजी नगरसेविका संध्या शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक दोन महिन्यांच्या 4 थ्या बुधवारी हे शिबिर घेतले जाणार आहे. यात 24 एप्रिल, 26 जून, 28 ऑगस्ट, 23 ऑक्टोबर व 11 डिसेंबर रोजी डोळ्यांचे शिबिर घेतले जाणार आहे, असे नितीन कांदळगावकर आणि शहराध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply