Breaking News

पेणमध्ये इतिहास संशोधन कार्यशाळा

पेण : प्रतिनिधी

इतिहास अभ्यास मंडळ व इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ आणि डॉ. पंतगराव कदम कॉलेजचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पेण येथील डॉ. पंतगराव कदम कॉलेजमध्ये इतिहास संशोधन पद्धती एमए भाग 2 प्रोजेक्ट बेस्ड कोर्स या विषयांवर आधारित एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्राचार्य बी. एन. सांगळे यांच्या हस्ते झाले. इतिहासकारांनी खरा इतिहास उजेडात आणण्याचे कार्य केले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. के. आर. गोसावी यांनी केले. संशोधन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी केले. ग्रामीण भागातून इतिहास संशोधक निर्माण व्हावेत, असे विचार मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदेश वाघ यांनी व्यक्त केले. इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग, डॉ. सुरेश पाथरकर, डॉ. जनार्दन कांबळे, प्रा. प्रकाश मेश्राम आदी मान्यवरांसह या कार्यशाळेसाठी रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी व प्राध्यापक या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार घोडके यांनी केले, तर कार्यशाळा समन्वयक प्रा. सुनील पवार यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

शेकापचा माजी नगरसेवक सुनील बहिराच्या पोलीस कोठडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रॉपर्टीसाठी मयत वडिलांचे खोटे शपथपत्र बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल तक्का …

Leave a Reply