Breaking News

कर्जफेडीसाठी सहकार्य करा -कौसल्या पाटील

पाटणेश्वर अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत कर्जदारांना आवाहन

पेण ः प्रतिनिधी

श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँकेच्या कर्जदारांनी कर्ज फेडण्यासाठी बँकेला सहकार्य करून कर्जाची फेड मुदतीत करावी, असे आवाहन बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले. श्री. पाटणेश्वर अर्बन को-ऑप बँक लि. बँकेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 22) अध्यक्षा कौसल्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज हॉल पेण येथे झाली. या वेळी मार्गदर्शन करताना कौसल्या पाटील बोलत होत्या. या सभेस बँकेचे उपाध्यक्ष वसंत आठवले, संचालिका प्रतिभा पाटील, संचालक व्ही. बी. पाटील, डॉ. दिनकर पाटील, रामनाथ पाटील, सीताराम पाटील, जयवंत मढवी, प्रभाकर म्हात्रे, मारुती कुर्‍हाडे, शशिकांत भगत, राजू वाडकर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. प्रशांत पाटील, माजी संचालक अशोक मोकल, जी. डी. पाटील, विजय गोरी, व्यवस्थापक बाळ उके आदी मान्यवरांसह बँकेचे अधिकारी-कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालू आर्थिक वर्षात एकूण 68.67 लाख इतका नफा झाला असून त्यातून प्राप्तिकराची व इतर तरतुदी वगळून बँकेला 15.17 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती पाटणेश्वर बँकेच्या अध्यक्षा कौसल्या पाटील यांनी दिली. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच बँकेची चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू असून बँकेची प्रगती चांगली असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. तसेच अहवाल सालात बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने एक कोटी 52 लाख एक हजार 527 इतकी थकबाकी व रुपये चार कोटी 63 लाख 37 हजार 40 इतकी नियमित खात्यांची अशी एकूण सहा कोटी 15 लाख 38 हजार 567 वसुली झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन व्यवस्थापक बाळ उके यांनी, तर आभार प्रदर्शन संचालक व्ही. बी. पाटील यांनी केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply