Breaking News

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छतेचे कीटवाटप

पाली ः प्रतिनिधी

सुधागड तालुका भाजप महिला मोर्चाने समाजोपयोगी कार्याला सुरुवात केली असून पेण-सुधागड-रोहा विधानसभा क्षेत्र सहसंयोजिका वैशाली मापारा यांच्या मार्गदर्शनाखाली सुधागड तालुक्यातील भाजपा महिला मोर्चाने राजकारण न करता समाजकारण करण्याचा विडा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सुधागड दौर्‍यावर असताना सुधागड महिला मोर्चाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहानिमित्त मोदींच्या कल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारतचा संदेश देत सुधागड आदिवासीवाडी पाड्यावर जाऊन सुधागड तालुका भाजप महिला मोर्चाने साबणाचे कीट, खाऊ म्हणून बिस्कीटचे पाकीट तसेच चॉकलेट वाटप करण्यात आले. या वेळी पेण-सुधागड-रोहा विधानसभा क्षेत्र सहसंयोजिका वैशाली मापारा, सुधागड तालुका महिला मोर्चा अध्यक्षा निहारिका शिर्के, वृषाली उर्फ दर्शना गुरव जोगळेकर, पाली शहराध्यक्षा आरती भातखंडे, तारामती सतपाल, उर्मिला महाले, रिया यादव, सौ. तांबे, योगिनी भातखंडे यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply