पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जण संकटात सापडलेले आहेत. अशा परिस्थितीत कुणीही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटायला येऊ नये. ज्यांना आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी फोनवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून द्याव्यात. सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे आणि ते वृद्धिंगत होत राहील, असा मला विश्वास असल्याचेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper