Breaking News

मुरूड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

मुरूड ः प्रतिनिधी

80 वर्षांची परंपरा असलेल्या मुरूड येथील सुपारी खरेदी-विक्री संघाच्या र्ीीरिीळीरपसर्र्हाीीीव.लेा संकेतस्थळाचे उद्घाटन संघाचे 90 वर्षीय ज्येष्ठ संचालक अ. सतार. का अली म्हसलाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महेश भगत, व्हाईस चेअरमन अस्लम हाल्डे, माजी चेअरमन संजय गुंजाळ, प्रमोद मसाला, प्रवीण भायदे, राजेंद्र भायदे, जगदिश पाटील, श्रीकांत गुरव, नरेश कर्णिक, रिआज ढकाम, ऋषिकांत डोंगरीकर, सिद्देश गद्रे, अमित बनकर, संदीप पाटील, आदेश दांडेकर, नथुराम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. या संकेतस्थळामुळे तालुक्यातील उत्तम दर्जाची सुपारी जगातील खरेदीदारांना पाहता येईल. चांगल्या दरात विकता येईल. महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेला हा सुपारी संघ तालुक्यातील गरीब बागायतदारांचा आधार समजला जातो. मुंबईतील व्यापार्‍यांपेक्षा जास्त दर संघ देतो. अनेकांच्या हाताला खासकरून महिलांना काम मिळते. महेश भगत व त्यांचे मंडळ यांनी संघाच्या नफ्यात 40 टक्के वाढ घडवून आणली आहे. पुढील काळात संघाच्या महाराष्ट्रात शाखा असतील. संघ गॅस वितरण व्यवसायदेखील उत्तमरीत्या चालवत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply