Breaking News

रेवदंड्यात पोलीस भरती मार्गदर्शन

रेवदंडा ः प्रतिनिधी

विकास सावंत अ‍ॅकॅडमी अलिबाग यांच्या वतीने रेवदंडा ग्रामपंचायत सभागृहात पोलीस भरती व सरळ सेवा भरती संदर्भात मार्गदर्शन शिबिर रविवारी (दि. 22) सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या वेळी विकास सावंत अ‍ॅकॅडमी अलिबागच्या वतीने संचालक विकास सावंत यांच्यासह श्रीकांत म्हात्रे, आयडीबीआय शाखा वावेचे शाखाधिकारी अमित कांबळे, आर्या जाधव, रेवदंडा अ‍ॅपल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संतोष जैन यांची उपस्थिती होती. या मार्गदर्शन शिबिरास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिरात विविध कोर्सेसची माहितीसह पोलीस भरती व सरळ सेवा भरतीचे मार्गदर्शन विकास सावंत अ‍ॅकॅडमीचे संचालक विकास सावंत यांनी उपस्थित विद्यार्थीवर्गास केले. या वेळी त्यांनी रेग्युलर व विकेण्ड कोर्सेस, ई-महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जाणार्‍या सरळ सेवा पदांच्या ऑनलाइन परीक्षेची पूर्वतयारी, एमपीएससी व यूपीएससीसाठी आयोजित बॅचसंदर्भात माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेची पूर्वतयारी आदी विषयांची माहिती व त्यासाठी मार्गदर्शन कालावधी आदींची माहिती दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply