खारघर ः रामप्रहर वृत्त
मंगळवारी (दि. 24) 10.30च्या दरम्यान खारघर सेक्टर 12 बी टाईप येथे पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी सत्यवान गावडे यांच्या जागृगतेमुळे डेंग्यूच्या अळ्या टायरमध्ये आढळून आल्या. ही बाब पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे व खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास आली. आपल्या निष्काळजीपणामुळे मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो. तरी सर्व नागरिकांनी कृपया उघड्यावर पाणी ठेवू नका. कानाकोपर्यात साचलेले पाणी आढळून आल्यास ते पाणी रिकामे करावे. जेणेकरून कोणालाही शारीरिक,मानसिक व आर्थिक त्रास होणार नाही, असे शत्रुघ्न काकडे यांनी सांगितले.