Breaking News

पनवेलमध्ये शेकापला मेगागळती; विद्यमान नगरसेविका चंद्रकला शेळके यांचे पती शशिकांत शेळके समर्थकांसह भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेतील शेकापच्या विद्यमान नगरसेविका चंद्रकला शेळके यांचे पती शेकाप नेते शशिकांत शेळके यांनी अनेक समर्थकांसह सोमवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर केला. त्यामुळे पनवेलमध्ये शेकापला आणखी एक हादरा बसला आहे. खांदा कॉलनीतील श्रीकृपा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेळके व सहकार्‍यांचे भाजपते स्वागत केले.

सिडको अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे आणि त्यांच्या कार्याचा झंझावात सर्वत्र पसरला आहे. त्यांच्या याच कार्यावर प्रभावित होऊन विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहे.

खांदा कॉलनीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ता अतुल पाटील, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नितीन पाटील, महादेव मधे, नगरसेविका मुग्धा लोंढे, सीता पाटील, शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी शशिकांत शेळके यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत महादेव पाटील, दशरथ शेळके, एकनाथ शेळके, हरिश्चंद्र म्हात्रे, विलास शेळके, विश्वास हुद्दार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपचे नेतृत्व स्वीकारले. शेळके हे डॅशिंग कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. त्यांच्या प्रवेशाने भाजप आणखी मजबूत झाला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply