Breaking News

एएससी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रयतच्या महात्मा फुले महाविद्यालयात जयंती कार्यक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे बुधवारी (दि. 25) आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकण विभाग सहसंचालक डॉक्टर संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती महात्मा फुले महाविद्यालयात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच या वेळी कर्मवीर जीवन परिचय गाथा या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास अलका धुरी, डॉक्टर अशोक आढाव, जी. जी. कोराने, बी. पी. भसणे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, रयत सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कोकण विभाग महासंचालक डॉक्टर संजय जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply