Breaking News

जैविक व्यवस्थापन समितीची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेंतर्गत जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात येणार असून, त्यासाठी सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, औषधी व रसायने संस्था, पक्षीतज्ज्ञ या क्षेत्रामध्ये उच्चतम पदवी धारण केलेल्या प्रत्येकी एका अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे.

सबंधित व्यक्ती महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून, त्या व्यक्तीचे नाव पालिका क्षेत्राच्या मतदार यादीमध्ये असणे आवश्यक आहे. ही शासकीय समिती असल्याने कोणतेही मानधन देण्यात येणार नाही. अशाप्रकारे पात्र असलेल्या व्यक्तीने आपली माहिती पनवेल महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागात 29 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावी. अधिक माहितीसाठी 022-27458040/41/42 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply