नागोठणे : प्रतिनिधी
वेगावर नियंत्रण न राहिल्याने दगडी कोळसा भरलेला एक ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला दहा फूट खाली उतरून पलटी झाल्याची दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री नागोठणे-पोयनाड मार्गावर येथील अंबा नदीच्या नवीन पुलालगत घडली. सानेगाव येथून कोळसा भरून ट्रक नाशिक बाजूकडे चालला होता. अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. अपघात किरकोळ असल्याने त्याची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.