Breaking News

टी-20मध्ये विश्वविक्रम; चौकारांचा पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी (दि. 29) झालेल्या टी-20 सामन्यात तिने 61 चेंडूंत 113 धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिने तब्बल 20 खणखणीत चौकार लगावले. टी-20मधील हा विश्वविक्रम आहे.

बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत चार गडी गमावून 217 धावांचा डोंगर उभा केला. तिने अवघ्या 54 चेंडूंत शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे या शतकी खेळीत तिने एकही षटकार लगावला नाही. ऑस्ट्रेलियाचे हे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला फक्त 176 धावाच करता आल्या. कर्णधार सी. अटापट्टूने 113 धावांची खेळी केली, मात्र संघाला विजय मिळू शकला नाही. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मुनीने स्वतःचा विक्रम मोडित काढला. याआधी तिने इंग्लंडविरुद्ध 2017मध्ये 19 चौकार ठोकले होते. सर्वाधिक चौकार लगावणार्‍या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची मॅट लेनिंग दुसर्‍या स्थानी आहे. तिने आयर्लंडविरुद्ध 18 चौकार तडकावले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply